कोरोना प्रतिबंधक लस येत नाही तो पर्यंत हा लढा कायम राहिल – मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांची संवाद साधताना आपल्याला लस येत नाही तोपर्यंत कोरोनासोबतचा लढा सुरुच ठेवायचा असून जेव्हा कधी कोरोना प्रतिबंधक लस येईल त्यानंतर ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. लस देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण या सगळ्यात निष्काळजीपणा कोणीही केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकते. म्हणून सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण सर्वांनी कोरोनाच्या संकटाशी चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. पण लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे, आपल्याला ती आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्या देशात आज कोरोना रुग्णांसाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातील चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणे ही आपली ताकद आहे.