‘ही’ भारतीय कंपनी करणार रशियन स्पुटनिक-व्ही लसीची विक्री


नवी दिल्ली – आपल्या देशात तयार होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला विकसित होण्यासाठी देशवासियांना जवळपास एका वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. पण तत्पूर्वीच रशियाची स्पुटनिक-व्ही ही कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल होऊ शकते. कारण RDIF शी दिल्लीतील मॅनकाईंड फार्मा कंपनीने करार केला आहे. भारतात या कराराअंतर्गत लसीचे मार्केंटिंग आणि वितरण केले जाणार आहे. दरम्यान लसीचे डोस किती क्षमतेने तयार केले जाणार जातील याबाबची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मॅनकाईंडसोबतच या लसीसाठी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजनेही RDIF शी भागीदारी केली आहे. तर दुसरीकडे ‘Brilife’ असे नाव इस्त्राईलने आपल्या कोरोना लसीचे ठेवले आहे. या लसीची मानवी चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सुरू होईल. कोरोना लस तयार केल्याचा दावा ऑगस्टमध्येच इस्त्राईलने केला होता.

शनिवारी डॉ रेड्डीज लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार स्पुटनिक-व्हीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) परवागनी दिली आहे. लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी ठरते हे मल्‍टी-रेंटर रँडमाइज्‍ड कंट्रोल या चाचणीत पाहिले जाणार आहे. गमलेया नॅशनल रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे. स्पुटनिक-व्ही जगातील सगळ्यात आधी तयार झालेली कोरोना लस आहे.

दूसरीकडे इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने (IIBR) इस्त्राईलची ही लस तयार केली आहे. यासंदर्भात IIBR चे डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्री या शब्दाचा हिब्रू भाषेत अर्थ आरोग्य असा होतो. il म्हणजे इज्राईल आणि जीवन. या लसीची मानवी चाचणी दोन सेंटर्सवर होणार आहे. ही चाचणी पहिल्या टप्प्यात १०० लोकांवर करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात १ हजार लोकांवर परिक्षण करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धता आणि वितरण यावर भारतात सरकारकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे.