पी.व्ही. सिंधूने कौटुंबिक तणावामुळे सोडले घर ?


ऑलिम्पिक तयारीसाठी सुरु असलेले राष्ट्रीय शिबिर भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने अर्ध्यावर सोडून थेट लंडनमध्ये पोहचली आहे. भारतीय बॅडमिंटन जगतात तिच्या शिबिर अर्ध्यावर सोडण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. पण तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तंदुरुस्ती आणि न्यूट्रीशिअनसाठी यूकेला गेल्याचे म्हटले आहे. सिंधू मागील दहा दिवसांपासून यूकेमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय शिबिर ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या सिंधूने अर्ध्यावर सोडणे आश्चर्यकारक आहेच. पण सिंधू थेट परदेशात असताना, तिच्यासोबत तिचे पालकही नाही आहेत. तिच्यावर यूकेमध्ये तज्ज्ञांची समिती लक्ष ठेवून असणार आहे. सिंधू दोन महिने यूकेमध्ये थांबेल, असा अंदाज आहे.

पण टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सिंधू लंडनला रवाना झाली, त्यावेळी ती खूप चिडलेली होती. कौटुंबिक तणाव सुद्धा एक कारण असल्याचे म्हटले आहे. सिंधूने हैदराबाद सोडण्यापूर्वी गोपीचंद अ‍ॅकेडमीतील प्रशिक्षकांना पुढचे आठ ते दहा आठवडे भारतात परतणार नसल्याचे सांगितले आहे.

सिंधूचे वडिल पी.व्ही.रामाना फोन उचलत नाही, त्याचबरोबर मेसेजला प्रतिसाद देत नाही. त्याचबरोबर सिंधू काही गोष्टींमुळे निराश आहे. तिची समजूत घालून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतात सिंधू लवकर परतण्याची शक्यता कमी आहे. तिला जीवनाच्या या टप्प्यावर तिच्या पद्धतीने आयुष्य जगायचे आहे. तिला स्वत:वर कोणाचे नियंत्रण नको आहे. तिला थोडे स्वातंत्र्य हवे असेल. या ब्रेकमध्ये तिला आनंद मिळेल आणि ती परत येईल, अशी अपेक्षा देखील सूत्रांनी व्यक्त केली.