या राज्यात केंद्राच्या नियमाची अंमलबजावणी; हेल्मेट नसल्यास सस्पेंड होणार लायसन


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतुकीच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पण तरी देखील देशात वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करणे ही सध्या हिरोगिरी मानली जाते. पण दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल तर तो गुन्हा आहे. अशातच याबाबत मोठा आदेश कर्नाटक सरकारने जारी केला आहे. दुचाकीस्वारचे लायसन बिना हेल्मेट दुचाकी चालविताना आढळल्यास सस्पेंड केले जाणार आहे.

देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. देशात दुचाकींच्या अपघाताची संख्याही जास्त असल्यामुळे कर्नाटक वाहतूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही हल्मेट सक्तीचे केले जाणार आहे. विनाहेल्मेट जर पकडण्य़ात आले, तर लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दंड देखील भरावा लागणार आहे.

दुचाकी चालविणाऱ्यांसाठी BS स्टँडर्डचे हॅल्मेट घालणे केंद्र सरकारच्या मोटर व्हेईकल अॅक्टच्या सेक्शन 129 नुसार आवश्यक आहे. कोणी जर नियम तोडत असेल तर त्याचे लायसन तीन महिन्यांसाठी सस्पेंड करावे. तसेच 1000 रुपयांचा दंडही आकारण्यात यावा. गेल्या वर्षी हे नवे नियम केंद्र सरकारने लागू केले होते. पण दंडाची रक्कम कर्नाटक सरकारने घटवून 500 रुपये केली होती. तसेच लायसन सस्पेंड करण्याचा आदेश लागू केला नव्हता. आता दंडाची रक्कम वाढवून लायसन निलंबित करण्याचा आदेशही लागू केला आहे. कर्नाटकमध्ये 1.65 कोटी अधिकृत दुचाकी आहेत. एकट्या बेंगळुरूमध्ये 59.9 लाख दुचाकी आहेत.