डिव्हीलियर्सचे फोटोग्राफी कौशल्य, विराट,अनुष्काचा रोमँटीक फोटो व्हायरल

फोटो साभार पत्रिका

मिस्टर ३६० डिग्री या नावाने क्रिकेट जगात प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हीलियर्सच्या कौशल्याचा आणखी एक सुंदर नमुना समोर आला आहे. त्याने काढलेला टीम इंडियाचा कप्तान आणि आयपीएल मध्ये बंगलोर टीमचा कप्तान विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्काचा एक रोमँटीक फोटो तुफान व्हायरल झाला असून खुद्द विराटनेच तो त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आयपीएल मध्ये डिव्हीलियर्स विराटच्याच बंगलोर संघाकडून खेळत असून सध्या दुबई येथे आयपीएल सामने सुरु आहेत. तेथेच डिव्हीलियर्सने हा फोटो काढला आहे.

या फोटोत आरसीबी कप्तान विराट आणि अनुष्का स्वीमिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. डिव्हीलियर्स आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी बजावतो आहेच. इतकेच नव्हे तर त्याने आरसीबीला मागच्या दोन्ही सामन्यात एकट्याच्या जिवावर विजयी केले आहे. अर्थात कोहली सुद्धा चांगला खेळत असून त्यांची टीम पॉइंट टेबल मध्ये टॉप तीन मध्ये पोहोचली आहे.

डिव्हीलियर्स उत्तम क्रिकेटपटू आहेच पण त्याचबरोबर तो गोल्फ, हॉकी, पोलो, बुद्धीबळ हे खेळ सुद्धा तितक्याच तयारीने खेळतो. तो गिटार वादन करतो आणि आता तो चांगला फोटोग्राफर आहे हे त्याने या फोटोने सिद्ध केले आहे.