आयफोन १२ घेताय, जिवापेक्षा अधिक सांभाळा डिस्प्ले

फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स

अॅपल इंकने आयफोन लाईनअप मध्ये नव्याने सादर केलेला बजेट आयफोन १२ मध्ये आयफोन ११ पेक्षा वेगळी सिरामिक शिल्ड डिस्प्ले दिला आहे आणि हे सिरामिक शिल्ड आयफोन ११च्या शिल्डपेक्षा चौपट अधिक मजबूत असल्याचा दावा केला आहे. यामुळे अनेक आयफोन प्रेमी आयफोन १२ सिरीज मधील फोन खरेदी करण्याच्या विचारात असतील. त्यांच्यासाठी हे वाचणे आवश्यक आहे.

आयफोन १२ सिरीज मध्ये दिल्या गेलेल्या सिरामिक शिल्ड मुळे डिस्प्लेवर स्क्रॅच येणार नाहीत किंवा ड्रॉप प्रोटेक्शनची अपेक्षा ग्राहक ठेऊ शकतात. पण कोणत्याही कारणाने डिस्प्ले तुटला तर त्यासाठी येणारा खर्च मात्र प्रचंड मोठा असेल. त्यामुळे आयफोन १२ ग्राहकांना त्यांच्या जीवापेक्षा अधिक फोनचा डिस्प्ले सांभाळा असा सल्ला योग्य ठरणार आहे. आयफोन ११च्या रिपेअर साठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा ८० डॉलर्स म्हणजे ५००० रुपये अधिक त्यांना भरावे लागणार आहेत. स्टँडर्ड आयफोन १२ आउट ऑफ वॉरन्टी डिस्प्ले रिप्लेस साठी २७९ डॉलर्स म्हणजे २०५०० रुपये खर्च येईल.

आयफोन १२ प्रो आणि मॅक्सचा स्क्रीन रिप्लेस करावा लागला तर तर येणारा खर्च आयफोन मिनी च्या स्क्रीन रिप्लेस खर्चापेक्षा अधिक आहेच पण त्यासोबत अन्य डॅमेज असेल तर ४४९ डॉलर्स म्हणजे ३३ हजार रुपये मोजावे लागतील. आयफोन १२ प्रो रिपेअरमेंट कॉस्ट ४०३०० रुपये आहे. अॅपल केअर प्लस असलेल्यांना थोडा दिलासा आहे. त्यांना ९९ डॉलर्स मोजावे लागतील. बॅटरी रिप्लेसमेंट साठी ६९ डॉलर्स म्हणजे पाच हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.