‘राज’ पुत्र अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अमित ठाकरे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी व्हायरल फ्लू असावा असा अंदाज वर्तवला आहे. पण कोरोनाच्या स्थितीत खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांना पुढील एक दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.