‘या’ दिवशी होऊ शकते विरुष्काच्या घरी नवा पाहुण्याचे आगमन


अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपला गरोदरपणाचा काळ खूप आनंदात घातवताना दिसत आहे. पण दूसरीकडे सध्या आयपीएलमध्ये तिचा पती विराट कोहली फारच व्यस्त आहे. अशातच अनुष्काही विराटचा धीर वाढवण्यासाठी त्याचा सामना मॅच बघायला आवर्जुन जात असते. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेला सामना पाहण्यासाठी अनुष्काही गेली होती. सध्या सोशल मीडियावर तिचा स्टेडियमवरचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसून येत आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट आणि अनुष्काचा एक फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने शेअर केला होता. त्याने त्यावेळी ‘बेबी डेट 10 नोव्हेंबर’ असे देखील लिहिले होते. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनलवर मुलाखत देत असताना 10 नोव्हेंबरला बाळाचा जन्म होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. ही माहिती स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विरल भयानीने शेअर केली. पण डेट शेअर केलेला फोटो अवघ्या 2 मिनिटांतच काढून टाकण्यात आला.

विराट आणि अनुष्काच्या बाळाच्या जन्माची तारीख वाचून अवघ्या 2 मिनिटांत त्या पोस्टला 1627 लाइक्स आले होते. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. पुढच्याच महिन्यात विराटच्या घरात बाळाचे आगमन होणार आहे. हे वाचून दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.