सोशल मीडियात व्हायरल होत आहे नेहा कक्करची लग्नपत्रिका


बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या विवाहसोहळ्याच्या गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चांनी जोर धरला. ज्यानंतर आता नेहा आणि रोहनप्रीतच्या रिसेप्शन सोहळ्याची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली. नेहा आणि रोहनप्रीतच्या रिसेप्नशन सोहळ्याची ताऱीख आणि ठिकाण या पत्रिकेमुळे आता सर्वांसमोर आले आहे.


पंजाबमधील मोहाली येथील The Amaltas येथे २६ ऑक्टोबरला हा सोहळा पार पडणार असल्याचा उल्लेख या पत्रिकेत करण्यात आला आहे. नेहा आणि रोहनप्रीतच्या विवाहसोहळ्यासंबंधीची, रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका काही फॅनपेजेसवरुन पोस्ट करण्यात आली असून, हे फोटो कमालीचे व्हायरलही होत आहेत. पण, त्याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. तूर्तास चाहत्यांनी या व्हायरल पोस्टच्याच बळावर आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाबाबतची माहिती खुद्द आदित्य नारायण यानेच दिली होती. त्यांचा हा विवाहसोहळा दिल्लीमध्ये पार पडणार असून, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांचीही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्याने दिली.