तुमच्याच पैशांवर एलआयसीने कमावले तब्बल 15 हजार कोटी


नवी दिल्ली : मागच्या 6 महिन्यांमध्ये देशातील सगळ्या मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने विक्रमी नफा कमावला आहे. याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार एलआयसीला कोरोनाच्या संकटकाळात तब्बल 15 हजार कोटींचा फायदा झाला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्समध्ये 2020-21 या आर्थिक वर्षात गुंतवणूक केल्यामुळे नफा आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला थेट 18,500 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

याबाबत एलआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या 6 महिन्यांमध्ये कंपनीत शेअर मार्केटमध्ये तब्बल 50,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. बाजार कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यामध्ये घसरल्याचे पाहायला मिळाले, पण जशी इक्विटीमध्ये कंपनीने गुंतवणूक वाढवली तशी आज एलआयसी कंपनी आज 15 हजार कोटी रुपयांच्या फायद्यामध्ये आहे.

यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बाजार कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्यात मार्केट कोसळलेले असताना कंपनीने गुंतवणूक केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बाँड्स आणि राज्य विकास कर्जांमध्ये 2.6 लाख कोटी रुपयांची गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 लाख कोटी रुपयांची आणखी एक गुंतवणूक योजना तयार केली आहे.