मधुमेह टाळण्याचे पाच उपाय

dibaties
नवी दिल्ली – भारतामध्ये मधुमेहाचे परिणाम वरचेवर वाढत चालले आहे. सर्दी किंवा थंडी ताप यासारख्या व्यापक प्रमाणावर होणार्‍या आजाराप्रमाणेच अनेकांना मधुमेहाची बाधा व्हायला लागली आहे. बैठी कामे, आरामदायी जिंदगी, निःसत्व आहार, व्यायामाचा अभाव आणि वाढती जाडी यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. जगभरात ३४ कोटी ६० लाख लोकांना या विकाराने पछाडले आहे. भारतात त्यांची संख्या ६ कोटी ३० लाख आहे. भारतातल्या मधुमेहींमध्ये टाईप टू डायबेटीस या मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. या प्रकारच्या मधुमेह जाडी वाढण्यामुळे आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यामुळे होतो.

केंद्र सरकारने २१ राज्यातल्या १०० जिल्ह्यांमध्ये लोकांसाठी काही प्रतिबंधक उपायांची यादी जाहीर केली आहे. कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकारापासून बचाव करण्याचे उपाय म्हणून हे उपाय जाणले जात आहेत. मधुमेह टाळण्यासाठी त्यात खालील पाच उपाय सांगितले आहेत. १. शारीरिक हालचाली टाळू नका. अर्थात त्यासाठी व्यायाम करा. व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ब्लड शुगरचे प्रमाण चांगले राखले जाते. नृत्य करणे, खेळणे, भरभर चालणे यामुळे टाईप टू डायबेटीसची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते. प्रत्येक जेवणानंतर १५ मिनिटे चालावे.

२. आरोग्यदायी आहार – मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार आवश्यक आहे. विशेषतः तंतूमय पदार्थांनीयुक्त अन्न खावे. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत. ३. पुरेशी झोप घ्यावी. किमान सात ते आठ तास झोप घेतल्याशिवाय माणसाला उत्साह वाटत नाही. झोप शांत लागावी यासाठी मनःस्थिती योग्य ठेवावी.

४. तणाव टाळावा – तणाव हे डायबेटीसचे सर्वात मोठे कारण आहे. केवळ डायबेटीसच नव्हेतर इतरही अनेक विकार तणावामुळे होत असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीची फार हाव धरून नये. ५. व्यसनांपासून दूर रहा – सिगारेट, दारू किंवा अन्य कोणतेही नशिले पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर ती सोडली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment