भारत चीन टक्कर- शाओमीला पछाडून सॅमसंग आघाडीवर

फोटो साभार ऑनफोन्स

भारत आणि चीन या दोन देशात सुरु असलेल्या सीमा वादात भारतीय सैनिकांबाबत चीनी सैनिकांनी जी क्रूरता दाखविली त्याची किंमत चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीला मोजावी लागत असल्याचे दिसून येत आहे. काउंटर पॉइंटच्या नव्या रिपोर्ट नुसार भारतीय बाजारात नंबर एक वर असलेली शाओमी मागे पडली असून आता सॅमसंगने एक नंबरवर कब्जा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गल्वान खोऱ्यात चीनी सैनिकांनी २१ भारतीय सैनिकांची निर्घृण कत्तल केल्याचा प्रकार घडल्यापासून भारतीय नागरिकांच्या मनात चीनविरुद्द राग खदखदतो आहे. संपूर्ण देशात चीनविरोधी भावना अतिशय मजबूत बनली आहे. याचा तोटा चीनी कंपन्यांना होत आहेच पण केवळ सॅमसंग नाही तर अन्य बिगर चीनी कंपन्याना त्याचा फायदा होताना दिसतो आहे.

सॅमसंगने ग्लोबल मार्केट मध्ये चीनी हुवावेला मागे टाकले आहे. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार सॅमसंगचा जागतिक बाजारातील हिस्सा २२ टक्क्यांवर गेला असून सहा महिन्यापूर्वी तो २० टक्के होता. याच काळात हुवावेचा हिस्सा मात्र २१ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर आला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर चीनी कंपन्यांना आणखी मोठ्या नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ येईल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.