शिंकणे सांगते तुमचे व्यक्तीमत्व

शिंक आली नाही अशी व्यक्ती या भूतलावर सापडणे अवघड. सर्दी झाली की शिंका येतातच पण अन्य वेळीही नाकात कांही गेले की शिंक येतेच. पण या शिंकण्याच्या तर्हेचवरून एखाद्याचे व्यक्तीमत्त्व कसे आहे हे सांगता येते असा संशोधकांचा दावा आहे. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे.
 
डॉ. अॅलन हर्स्ट यांनी ही निरीक्षणे नोंदविली आहेत. अॅलन न्यूरॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचा मानसशास्त्राचाही चांगला अभ्यास आहे. त्यांनी स्मेल अॅन्ड टेस्ट ट्रीटमेंट रिसर्च फौंडेशन ही संस्थाही स्थापन केलेली आहे. हर्स्ट यांच्या मते शिंकणे हे हसण्यासारखेच असते. एखादा जोरात हसतो, एखादा गालातल्या गालात हसतो. तसेच कुणी जोरात शिंकते तर कुणी अगदी हळू आवाजात शिंकते. विशेष म्हणजे लहानपणापासूनच्या शिंकण्याच्या या सवयीत मोठेपणीही बदल होत नाही.

शिंकणे हे सायकॉलॉजिकलही असते. एखादी व्यक्ती बोलकी, डेमॉन्स्टेटिव्ह आणि आऊट गोईंग स्वभावाची असेल तर तिचे शिंकणेही जोरात असते. याउलट लाजाळू, आपल्याच कोशात रमणार्‍या व्यक्ती चार चौघात असताना  शिंक दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचे शिंकणेही अगदी हळू असते. त्यांच्या शिंकण्याचा आवाज दबका येतो.

वास्तविक शिंक ही शरीराची प्रतिकार करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे एखादा हानीकारक बॅक्टेरिया किवा शरीराला अपाय करू शकणारी अन्य कोणतीही वस्तू शरीरात जात असेल तर शरीराची ती बाहेर टाकण्याची प्रतिक्रिया म्हणजे शिंक येणे. शिंक सहजासहजी दाबता येत नाही. मात्र ही शिंक तुमचे व्यक्तीमत्त्व कसे आहे ते सांगू शकते हे विशेष.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment