मानसिक ताणावर साधे उपाय

stressवॉशिंग्टन – सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेक मानसिक तणाव वाढायला लागले आहेत. हा तणाव मर्यादेत असे पर्यंत फारसे घाबरण्याचे काम नसते. परंतु तो अधिक गंभीर स्वरूप धारण करायला लागला की त्याचे परिणाम नोकरी, नातेसंबंध, व्यवसाय आणि विशेषतः शारीरिक स्वास्थ्य यांच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावर मानसशास्त्रज्ञांकडे जाणे किंवा गोळ्या औषध घेणे हे तर उपाय आहेतच परंतु डॉक्टरकडे न जाता आपल्या वर्तनात, दिनचर्येत आणि विचार करण्याच्या पध्दतीत काही साधे बदल केले तरी औषधे न घेता मानसिक तणावावर उपाय करता येतो. हा उपाय बिनखर्ची तर असतोच पण त्याचे कसलेही साईडइफेक्ट होत नाहीत.

मानसिक तणाव वाढायला लागेल तेव्हा आपल्या कुटुंबियांकडे आणि मित्रांकडे वळा. त्यांना आपल्या मनातले दुःख सांगा. त्यांच्याकडून निश्‍चितपणे दिलासा मिळेलच असे नाही पण आपले मन मोकळे झाल्यामुळे तणाव कमी होतो. माणसाने अशा अवस्थेमध्ये सकारात्मक विचार करणार्‍या आशावादी लोकांच्या संपर्कात रहावे त्यामुळे जीवनातले प्रश्‍न सुटू शकतात असा विश्‍वास आपल्या मनातच जागा होतो आणि आपले तणाव कमी होतात.

अनेकांच्या घरांचे बांधकाम घरात भरपूर प्रकाश न येणारे असते. अशा घरातल्या अंधारांमुळे माणसाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत नाहीत. अंधार्‍या घरात कोणती समस्या नसतानासुध्दा मनात नैराश्य दाटून येते तेव्हा मनावरचा तणाव वाढला की घर सोडून रस्त्यावर या आणि स्वच्छ सूर्यप्रकाश १५ मिनिटे फिरा. त्याने मनावरचा तणाव कमी होईल. दररोज व्यायाम करणे, चांगले सकस अन्न खाणे, चांगली भरपूर झोप घेणे हेही उपाय मानसिक तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरतात. आपल्या जेवणामध्ये ब जीवनसत्वाचा वापर भरपूर असला पाहिजे. तो असला की माणूस बी पॉझिटिव्ह होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment