पाळीव प्राणी हृदयविकारावर गुणकारी

भारतात पाळीव प्राणी पाळण्याची ङ्गारशी सवय नाही. काही निवडक लोकच कुत्री पाळतात. काही लोक मात्र हौसेने मांजरही पाळतात. अगदी निवडक लोकांनी ससे, पोपटही पाळलेले असतात. त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा काही लोकांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना आश्‍चर्यजनक निष्कर्ष मिळाले. अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातल्या हौस्टन येथील बायलर कॉलेज ऑङ्ग मेडिसिन या संस्थेतल्या संशोधकांनी कुत्री पाळणारे काही लोक आणि न पाळणारे काही लोक यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे लक्षात आले की, ज्यांच्या घरात कुत्रे पाळलेले असते त्यांना हृदयविकाराचा त्रास तुलनेने कमी असतो.

हा निष्कर्ष हाती आला तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. कारण हृदय विकार कसा कमी करावा हा गहन प्रश्‍न आपल्या समोर आहे आणि त्याला एवढे सोपे उत्तर सापडत असेल तर मग ङ्गारच मोठे यश म्हणावे लागेल. पण असा आकडेवारीचा निष्कर्ष निघून चालत नाही. कुत्रा किंवा पाळीव प्राणी आणि हृदयविकार यांचा नेमका शास्त्रीय संबंध काय आहे आणि तो कसा काम करतो हे दाखवून द्यावे लागेल. म्हणून मग तज्ञांनी अधिक संशोधन सुरू केले. त्यांना असे आढळले की, तसा कुत्र्याचा आणि त्याच्या मालकाच्या हृदयाचा थेट काहीच संबंध नाही. एक अप्रत्यक्ष संबंध मात्र आहे. कुत्रा पाळणारांना त्याला पहाटे ङ्गिरायला न्यावेच लागते. त्यात काहीच खंड पडून चालत नाही.

कुत्र्याला ङ्गिरायला नेणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे कारण या कामात मालकाला आपल्या नेहमीच्या सरावापेक्षा वेगाने चालावे लागते. या शिवाय कुत्रा पाळणारांना त्याच्या निमित्ताने अन्यही काही शारीरिक हालचाली कराव्या लागतात. एकुणात भरभर चालणे आणि दिवसभरात होणार्‍या हालचाली यांनी शरीराला जो व्यायाम होतो त्याचा परिणाम म्हणून हृदयविकाराची शक्यता कमी होते. त्याशिवाय एकाकी लोकांना पाळीव प्राण्याची सोबत मिळाली की त्यांचा रक्तदाब कमी होतो. त्याचाही परिणाम जाणवत असेल असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आणखी एक परिणाम मनावर होतो. घरात पाळीव प्राणी असेल तर सकारात्मक विचार बळावतात आणि त्यामुळे हृदयविकारावर आपोआपच इलाज होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment