नुसती बिस्किटे खाण्याचा ४० लाख पगार

फोटो साभार कॅच न्यूज

कमी कष्टाची, चांगल्या कमाईची आरामदायक नोकरी मिळावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशी नोकरी असेल का अशी शंका घेणाऱ्यांनी ही माहिती जरूर वाचावी. स्कॉटलंड मधील बिस्कीट उत्पादक कंपनीला असे एम्प्लॉईज हवे आहेत. त्यांनी नुसती बिस्किटे खायची आणि वर्षाला त्यांना ४० हजार पौंड म्हणजे ४० लाख रुपये पगार कंपनी देणार आहे.

या कंपनीला मास्टर बिस्कीटर हवे आहेत. अर्थात या बिस्कीट टेस्टरनी नुसती बिस्किटे खायची आणि त्याची टेस्ट सांगायची. पण त्याचबरोबर त्यांना जर बिस्किटाचे सखोल ज्ञान असेल, त्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य आणि संवाद कला असेल तर त्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. कंपनीचे प्रमुख पॉल पार्किन म्हणतात आमच्याकडे मोठ्या संखेने अर्ज यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही जणांची मुलाखत घेतली आहे. हा फुलटाईम जॉब आहे शिवाय वर्षाला ३५ सुट्ट्या दिल्या जाणार आहेत.

यामुळे अनेकांना आरामदायी नोकरीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी आहे. ग्राहकांना सर्वोत्तम स्वादाची आणि गुणवत्तेची बिस्किटे मिळावीत असा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना मास्टर बिस्कीटर हवे आहेत. २०१९ मध्ये कॅडबरीने सुद्धा अशीच चॉकलेट टेस्टर साठी पद भरती केली होती. त्यांना दुकानात विक्रीसाठी जाण्यापूर्वी चॉकलेटची चव टेस्ट करणारे चार टेस्टर हवे होते.