निकोटीनचा असाही उपयोग

तंबाखूत निकोटीन असते. त्यामुळे तंबाखू खाऊ नये हा सल्ला आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. त्यामुळे आपल्या मनावर निकोटीन हे विष आहे ही गोष्ट ठसलेली आहे. पण निसर्गात अनेक चमत्कार आहेत. काही औषधे विष ठरत आहेत तर निकोटीनसारखी विषे काही प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याचे दाखवत आहेत. निकोटीन केवळ तंबाखूतच असते असे नाही. ते अनेक खाद्य पदार्थांत कमी जास्त अंशात असते.

काळे मिरे, टोमॅटो यातही सूक्ष्म प्रमाणात का होईना पण निकोटीन असतेच. अशा अगदी कमी निकोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करणे काही विकारांवर गुणकारी ठरत असल्याचे काही निरीक्षणांत दिसून आले आहे. या पदार्थांचे सेवन करणारांना पार्किन्सन्स डिसीज म्हणजेच कंपवात हा विकार होण्याची शक्यता कमी असते असे काही निरीक्षणांत दिसून आले आहे. वनस्पती जगतात सोलॅनेशिया या ङ्गॅमिलीत समाविष्ट असणारी काही ङ्गुलझाडे आहेत.

या वनस्पतींमध्ये निकोटीन तयार होते असे दिसून आले आहे. या वनस्पतीचा वापर कंपवातावर केला तर हा विकार होण्याची प्रक्रिया मंद होते असे दिसून आले आहे. कंपवात हा माणसाच्या हालचालंीतली सुसंगती कमी करणारा विकार आहे. कारण त्यात हालचालींचे नियंत्रण करण्याची क्षमता असलेल्या पेशी नष्ट होत असतात. मेंदूत डोपॅमाईन नावाचे द्रव्य हेे काम करीत असतात. ते द्रव्य तयार होईनासे झाले की नियंत्रक पेशी तयार होत नाहीत आणि मेंदूचे हाता पायांच्या हालचालीवरचे नियंत्रण कमी होते. निकोटीनने या हालचालीवर नेमके कसे नियंत्रण येत याची प्रक्रिया ठावूक नाही पण पाहणीत असे आढळून आले आहे की निकोटिन युक्त अन्नाचे सेवन करणारा माणूस या कंपवाताचा अधिक प्रभावीपणाने प्रतिकार करू शकतो.

आहाराशिवाय सिगारेट ओढून शरीरात निकोटीन घेणारेही अनेक लोक आहेत. त्याच्यात पार्किन्सन्स डिसीजचे प्रमाण कमी आहे. हा निष्कर्ष काढताना कोण किती सिगारेटी ओढते याची माहिती गोळा करण्यातआली. सिगारेट ओढणारा माणूस कदाचित कंपवातापासून मुक्त होतही असेल पण त्याची तंबाखू त्याला इतर काही विकारांना बळी पाडते. तेव्हा कंपवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी निकोटिनकरिता त्याचा समावेश असलेले मिरे किंवा टमाटे खावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment