घने, काले बालों का राज

वॉशिंग्टन – आपले केस भरपूर लांब, दाट, काळेभोर आणि चमकदार असावेत असे प्रत्येक महिलेला वाटत असते. मात्र आजकाल जीवनपध्दतीत झालेल्या बदलामुळे तसेच आहारामुळे केसांचे सौंदर्य कमी होत चालले आहे. मात्र काही तज्ञांना असे वाटते की आहारामध्ये केलेल्या काही विशिष्ट बदलांमुळे पुन्हा एकदा केसांचे सौंदर्य प्राप्त करता येऊ शकते.

सॅमन: ज्यांच्या आहारामध्ये माशांचा वापर जास्त असतो त्यांचे केस चांगले असतात असे सर्वसाधारणपणे दिसते. सॅमन नावाचा मासा आहे. त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड त्याचबरोबर उत्कृष्ट दर्जाची प्रथिने, ब १२ जीवनसत्व आणि लोह विपुलतेने असते. त्यामुळे सॅमन फूड केसांसाठी जरुर खाल्ले पाहिजे. केसांची मुळे बळकट होण्यास त्यांचा उपयोग होतो आणि केसांची चमक वाढते. मात्र शाकाहारी लोकांना सॅमन चालणार नाही. त्यांच्यासाठी खालील आहाराची सूचना केली जाते.

हिरव्या गर्द पालेभाज्या: भरपूर हिरव्या रंगाच्या पालेभाज्या केसांसाठी उपयुक्त ठरतात. विशेषतः पालक ही भाजी केसांचे सौंदर्य वाढवू शकते. हिरव्या पालेभाज्यामध्ये सेबम हे तेलकट अन्नद्रव्य जे केसांचे सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त ठरते. आजकाल अनेक शाकाहारी लोक अंडी खात आहेत. अंडी शाकाहारी असतात हे त्यांना पटलेले आहे. पण अंडी खाण्याने केसांचे सौंदर्य वाढते. अंड्यातील बायोटीन हे द्रव्य केसांना उपयोगी ठरते.

रोजच्या जेवणामध्ये शेंगादाणे, मटकीची उसळ, काजू यांचा वापर केल्याससुध्दा केस चांगले होतात. या कामी बदामाचा विशेष करून वापर होतो. अन्य भाजांमध्ये गाजर हे केसांसाठी जास्त फायदेशीर असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment