करोना बरोबरची लढाई अवघड, सांगतेय जेनेलिया देशमुख

फोटो साभार द स्टेट्समन

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख करोना संसर्गातून पूर्ण बरी झाली असून तिची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. या बाबत इन्स्टाग्रामवर जेनेलियाने एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने करोना बरोबरची लढाई अवघड असल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट मध्ये जेनेलियाची करोना टेस्ट पोझीटीव्ह आली होती. २१ दिवसाच्या विलगीकरणात राहिल्यावर तिची पुन्हा टेस्ट करण्यात आली तेव्हा ती निगेटिव्ह आली आहे.

जेनेलियाने हा सर्व काळ डिजीटली अॅक्टीव्ह राहून काढला. जेनेलिया म्हणते,’ तुम्ही डिजीटली कितीही अॅक्टीव्ह असलात तरी तुमचा एकटेपणा त्यामुळे दूर होऊ शकत नाही. करोना टेस्ट पोझिटिव्ह आली तेव्हा तिच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नव्हती आणि आजही दिसत नाहीत. पण एकांतवासात काढावे लागलेले २१ दिवस फार अवघड गेले. मी आता माझा परिवार, माझे जिवलग यांच्यात परतले आहे त्याचा खूप आनंद होतोय. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याजवळ असण्यासारखे दुसरे सुख नाही. त्यामुळे आपल्याला लढण्याची शक्ती मिळते. तेव्हा शंका असेल तर करोना टेस्ट करून घ्या, चांगला आहार घ्या आणि करोनाला हरवा.’