नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून बदलणार सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियम


नवी दिल्ली : तुमच्या घरी येणाऱ्या एलपीजी सिलेंडर संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आला असून आता पूर्वीसारखी तुमच्या LPG सिलिंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया नसणार आहे. कारण, डिलिव्हरी यंत्रणा पुढच्या महिन्यापासून बदलली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घरगुती सिलेंजरची होणारी चोरी थांबवण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या 1 नोव्हेंबरपासून नवीन एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी प्रणाली लागू करणार आहेत. ही नवीन प्रणाली काय आहे आणि होम डिलिव्हरी कशी असणार याची माहिती आम्ही आमच्या वाचकांना देत आहोत.

DAC म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे नाव या नव्या नियमाला देण्यात आले असून आता फक्त बुकिंगवरच सिलेंडरची घरी पोहोचणार नाही तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला कोडही पाठवावा लागणार आहे. डिलिव्हरी बॉयला जर तुम्ही कोड सांगितला नाही तर तुम्हाला सिलेंडरही मिळणार नाही.

एखाद्या ग्राहकाने जर वितरकाकडे मोबाइल नंबर अपडेट केला नसेल तर डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल ज्याने तुम्ही तुमचा नंबर क्षणात अपडेट करू शकता.

अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांचा पत्ता चुकीचा आहे आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यामुळे सिलेंडर्सची डिलिव्हरीदेखील थांबवली जाऊ शकते.

या प्रक्रियेला तेल कंपन्यां सगळ्यात आधी 100 स्मार्ट शहरांमध्ये लागू करणार आहे. जयपूरमध्ये याचा पायलट प्रोजेक्टही सुरू झाला आहे. सगळ्यात विशेष बाब म्हणजे, तेल कंपन्यांना या प्रकल्पातून 95 टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे. दरम्यान, ही सिस्टीम व्यावसायिक सिलेंडरवर लागू होणार नाही.