
सोलापूर – राज्य सरकारचा मुख्यत्वे आरक्षणाचा विषय असून यामध्ये केंद्र सरकारची मदत घेवून घटना बदलण्याचा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. शनिवारी पंढरपूरच्या महापुराची संभाजीराजे छत्रपती यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राज्य घटना बदलण्यासंदर्भात खासदार संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य
ECBC कायदा आपण तयार केला आहे. मराठा समाजाला मागास असल्याची मान्यता सुद्धा मागासवर्गीय आयोगाने दिली आहे. उच्च न्यायालायनेही या कायद्याला मान्यता दिल्यामुळे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारकडून जर काही घडले नाही. तर केंद्र सरकारकडून राज्य घटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू असल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
