स्थलांतरित मजुरांच्या ‘मनरेगा’ यादीमध्ये दीपिका पादुकोणचा समावेश


आजवर आपण अनेक परीक्षांमध्ये चुकीचे नाव अथवा फोटो लावल्यामुळे गोंधळ उडाल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. पण आता अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत असाच एक प्रकार चक्क घडला आहे. तिच्या फोटोचा समावेश मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या यादीमध्ये (मनरेगा) असल्याचे उघड झाले आहे. कार्डवर तिच्यासोबत अन्य दहा जणांच्या चुकीचा फोटो असल्याचे डीएनएने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

चक्क दीपिका पादुकोणचा फोटो मध्य प्रदेशातील झिरनिया पंचायतीमधील एका गावात मनरेगा जॉब कार्डवर लावण्यात आला आहे. तसेच लाखो रुपयांचे दावे या बनावट कार्डच्या माध्यमातून करण्यात आल्याचे जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ३० हजार रुपयांची रक्कम तलाव आणि कॅनॉल बनविण्यासाठी देण्यात आली आहे. यावर शांतीलाल आणि अन्य लोकांची नावे आहेत; पण याबाबतची त्यांना काहीच माहिती नाही. यात नाव असलेले दुबे म्हणतात की, आपण एक दिवसही असे काम केलेले नाही. दरम्यान, खरगोन जिल्ह्यातील नाका या गावातील सोनू शांतिलाल नामक व्यक्तीच्या कार्डवर दीपिका पादुकोणचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच शांतिलाल यांनी नाला करण्यासाठी मनरेगाकडून पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.