ब्रेकफास्ट न करणे हृद्रोगास निमंत्रण

breakfast
वॉशिंग्टन – जे लोक सकाळचा ब्रेकफास्ट टाळतात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याची शक्यता असते. ब्रेकफास्ट करणार्‍यांपेक्षा ब्रेकफास्टस्ट न करणारे लोक हृद्रोगास बळी पडण्याची २७ टक्के जास्त शक्यता असते, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. १९९२ ते २००८ अशी सोळा वर्षे ४५ ते ८२ वर्षे वयोगटातील २७ हजार लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि त्यांना जडणारे विकार यांच्या सतत नोंदी ठेवून त्या नोंदींच्या विश्‍लेषणातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या नोंदीतून असेही आढळून आले आहे की, सकाळची न्याहरी नियमितपणे करणारे लोक न करणार्‍यांपेक्षा अधिक तरुण दिसतात. त्याचबरोबर न्याहरी न करणार्‍यांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर हे लोक मद्यपान सुद्धा अधिक करतात. न्याहरी करणारे लोक मात्र व्यसनाला कमी बळी पडणारे आणि तुलनेने अधिक सक्रिय असतात, असेही दिसून आले आहे.

न्याहरी टाळण्यामुळे जाडी वाढण्याचीही शक्यता असते. त्याचबरोबर ती टाळणार्‍या लोकांना उच्च रक्तदाब, चरबीचे प्रमाण जास्त आणि मधुमेह असेही त्रास होतात. बोस्टनच्या स्कूल ऑङ्ग पब्लिक हेल्थ या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑङ्ग न्यूट्रिशन या विभागातील संशोधकांनी ही पाहणी केलेली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment