फेसबुकवरून अनफ्रेंड होण्यापासून करा बचाव

फेसबुकवरील आपल्या फ्रेंडलिस्टमधून आपण अनफ्रेंड तर केले जात नाही आहोत ना याची काळजी घ्या असा इशारा नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून दिला गेला आहे. यूकेच्या डिस्काऊंट शॉपिग साईट प्रमोशनल ओआरजी यांनी हे सर्वेक्षण केले आहे.

या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षानुसार सतत बढाया मारणारे, इमोशनल माहिती देणारे, सतत स्टेटस अपडेट करणारे फ्रेंडलिस्टमधून अनफ्रेंड केले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ८२० फेसबुक युजरचा या सर्वेक्षणात सहभाग होता. त्यात फ्रेंडलिस्टमधल्या मित्रांना अनफ्रेंड करण्याची कारणे विचारली गेली. तेव्हा वरील प्रकारे वर्तणूक करणारे फ्रेंड कंटाळवाणे होतात असे निष्पन्न झाले.

६८ टक्के युजरने या ना त्या सोशल नेटवर्कींग साईटवर फ्रेंडलिस्ट मधल्या लोकांना अनफ्रेंड केल्याचे सांगितले. कारण आहे जादा बढाया मारण्याची सवय. ६१ टक्के युजरनी प्रेमासंबंधी अगदी ओतप्रोत भावनेने भरलेले संदेश देण्यामुळे अनफ्रेंड केल्याचे कारण दिले. या अतिभावनाचा उबग येतो असे त्यांचे म्हणणे आहे. स्टेटस सतत अपडेट करत राहणार्यांधनाही अनफ्रेंड करण्याचे प्रमाण मोठे आहेच पण अनावश्यक फोटो लोड करत राहणे, फारच वैयक्तीक माहिती देणे या कारणांवरूनही अनफ्रेंड केले जाणार्यांकचे प्रमाणही लक्षणीय आहे.

११ टक्के युजरने अनफ्रेंड करण्यामागे खराब भाषेचा वापर, प्रत्यक्ष भेट झाली नाही म्हणून अशाही कारणे दिली आहेत. तेव्हा सोशल साईटवर बातचीत करताना यापुढे थोडी सावधानता बाळगा आणि आपल्या फ्रेंडसना आपला कंटाळा तर येत नाही ना याची काळजी घ्या असा सल्ला दिला गेला आहे.

Leave a Comment