लहान मुलांचा पित्तापासून बचाव करा

acidity2
नवी दिल्ली : एखाद्या वेळी आपल्या मुलाचा घसा दुखायला लागतो, घसा सुजतो आणि मुलाला सडकून ताप येतो. डॉक्टरकडे तपासायला नेले की घशाला इन्ङ्गेक्शन झाल्याचे निदान केले जाते आणि इन्ङ्गेक्शन कमी होण्यावर गोळ्या दिल्या जातात. परंतु काही वेळा घसा दुखण्याचा हा प्रकार ऍसिडिटी किंव पित्तामुळे उद्भवलेला असतो. हे लक्षात घेतले पाहिजे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला हा एक ताप आहे आणि त्यामुळे लहान मुलांच्या दैनंदिनीकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अपोलो हॉस्पिटलमधील डॉ.अजय कुमार यांनी अलिकडच्या काळात तारुण्यात पदार्पण करणार्‍या मुलांमुलींमध्ये ऍसिडिटीचे प्रमाण वाढताना पाहिले आहे. शाळेत जाणारी मुले शाळेत जाण्याच्या घाईमध्ये वचावचा खात नाश्ता करतात आणि त्याचा परिणाम म्हणून ऍसिडिटी वाढते. तो नाश्ता मनापासून करत नाही आणि शाळेतल्या जेवणाच्या सुट्टीपर्यंत त्याला चांगली भूक लागलेली असते पण सुट्टीशिवाय खायला मिळत नाही.

मुलांच्या डब्यामध्ये त्याला काय खायला देतो यावरही ऍसिडिटी वाढणे अवलंबून असते. विशेष करून जंकङ्गूड किंवा मैद्यापासून बनवलेले खाद्य पदार्थ त्याच्या डब्यात दिलेले असतात. जेवणाच्या सुट्टीपर्यंत भूक ताणलेली आणि ताणलेल्या भुकेच्यावेळी असे खाद्यपदार्थ त्यामुळे त्याला पोट भरल्यासारखे वाटते पण त्याच्या खाण्यात पोषण द्रव्ये नसतात. परिणामी ऍसिडिटी अजून वाढत जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment