अमेरिकेत कुत्र्याच्या चेहर्‍यावर कॉस्मेटिक सर्जरी

जाबोअंगा (फिलीपीन्स) – आधुनिकतेच्या शिखरावर असलेल्या अमेरिकेत कधी काय घडेल, याची खात्री देता येत नाही. काही दिवसापूर्वी अमेरिकेत एका मादी कुत्र्याच्या चेहर्‍याची सर्जरी करण्यात आली आहे. या मादी कुत्र्याचे नाव आहे कबांग. दोन लहान मुलांचा जीव वाचविताना या कुत्रीच्या चेहर्‍यावर मोठी जखम झाली होती. तसेच चेहर्‍यातील हाडेही मोडली होती. अर्धा चेहरा तुटला होता. तिच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे २७ हजार डॉलर्स इतकी रक्कम जमली होती.

आपला मूळ चेहरा बदलून नवीन चेहरा धारण करण्याकडे आजकाल अनेकांचे लक्ष असते. सौंदर्य वाढीसाठी अश्या सर्जरी केल्या जातात. कधी-कधी अपघात झाल्यामुळे नाईलास्तव सर्जरी करावी लागते. आतापर्यंत माणसांसाठी असलेली ही सोय कुत्र्यासाठीही उपलब्ध झाली म्हणायची. कबांग अमेरिकेतील आठ महिन्यांच्या उपचारानंतर आता आपल्या गावी परतली आहे.

फिलीपीन्समधील जाबोअंगा शहरात या कबांग कुत्रीच्या सन्मानासाठी एक विशेष कार्यक्रम घेण्याचे आयोजन केले जात आहे. दोन वर्षापूर्वी एक अशी घटना घडली होती की कबांगने आपल्या मालकाची मुलगी आणि भाचीला वाचविले होते. त्या दोघींना वाचविण्यासाठी कबांग या दोन मुलींच्या दिशेने येत असल्यामुळेच मोटार गाडीच्या आडवी गेली. कबांगच्या उपचारासाठी फेसबुक आणि ट्विटरवर वेगळे अभियान राबविण्यात आली होती. जनावरांचे डॉक्टर एंटन लिम यांनी सांगितले की, कबांगच्या उपचारासाठी जगातील ४५ देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. तसेच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये कबांगवर सर्व उपचार करण्यात आले असल्याचेही लिम यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment