जगातील महागडी दुर्गा मूर्ती

durga-agar
नवरात्रातील तीन दिवसांच्या दुर्गा पूजेचा उत्सव आता अगदी तोंडावर आला आहे. देशभरात विविध ठिकाणी दुर्गापूजेची जोरदार तयारी सुरू आहे. त्रिपुरातील आगरताळा येथेही अशी तयारी सुरू असून दुर्गादेवीच्या मूर्तीबरोबरच मांडव सुशोभित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. येथील एका मंडळाने जगातील सर्वाधिक महागडी दुर्गा मूर्ती पुजेसाठी तयार केली असून तिची किंमत आहे ४ कोटी रूपये. चमकदार सोने व त्याला झगमगणार्‍या हिर्यांीची सजावट यामुळे या मूर्तीवर नजर ठरविणे अवघड होत असल्याचेही समजते.

pandal
पश्चिम बंगालमधील कलाकार इंद्रजित पोद्दार यांनी ही १०.५ फटाची भव्य मूर्ती साकारली असून तिच्यावर सोने व अमेरिकन डायमंड जडविेले गेले आहेत. या मूर्तीसोबत लक्ष्मी, सरस्वती, गणेश व कार्तिक यांच्याही मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. मु्ख्य मूर्तीसाठी वापरले गेलेले सोने व मौल्यवान खड्यांमुळे या मूर्तीच्या संरक्षणाचा मोठाच प्रश्न मिर्माण झाला असल्याचे समजते. मूर्ती घडविणार्‍या कलाकाराच्या घराबाहेरही मोठ्या संख्येने पोलिस तैनात केले गेले आहेत तसेच संबंधित मंडळानेही ३५ सुरक्षा रक्षक नेमले आहेत. राज्य सरकारनेही या मूर्तीला संरक्षण देण्याची व्यवस्था केली असल्याचे समजते. याच कलाकाराने २०१४ मध्ये उज्जयंत महालासाठी मोती जडविलेली मूर्तीही साकारली होती.

Leave a Comment