काही क्षणांसाठी मान सरळ करणारी चमत्कारी कंकाली माता

kalima
छत्तीसगढच्या रायसेन जिल्ह्यातील गुडावळ येथील प्राचीन काली मा अथवा कंकाली मातेचे मंदिर दसर्‍याच्या दिवशी भक्तांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असते कारण दसर्‍यादिवशी या मंदिरात काही क्षणांसाठी एक चमत्कार घडतो व हा चमत्कार ज्याला पाहायला मिळतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी दूर होतात असा भाविकांचा विश्वास आहे.

नवरात्री म्हणजे दुर्गेचा उत्सव. देशभरात या काळात दुर्गेची अनेक आकर्षक रूपे भाविकांना पाहायला मिळत असतात. मात्र या कंकाली मातेचे रूप आगळेच म्हणायला हवे. रायसेनरोडवर बिलखिरीया गावापासून थोड्या अंतरावर दाट जंगलात असलेले हे स्थान येथील वनसंपदेसाठीही प्रसिद्ध आहे. या मंदिरात असलेल्या कंकाली देवीची मूर्ती भव्य आहेच पण तिची मान ४५ अंशात कललेली आहे. दसर्‍याच्या दिवशी कांही क्षणांपुरतीच ही देवी आपली मान स्वतःच सरळ करते असे सांगितले जाते. ज्या भक्तांना मातेचा हा चमत्कार पाहता येतो, ज्यांची सर्व संकटे दूर होतात असा समज आहे व त्यामुळे या मंदिरात दसर्‍यादिवशी भाविकांच्या प्रचंड रांगा लागतात.

हे मंदिर प्राचीन आहे. येथील देवीच्या मूर्तीला २० हात आहेत तसेच ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्या प्रतिमाही येथे आहेत. वर्षभरच या स्थानावर भाविकांची गर्दी असते. चैत्री नवरात्रात येथे रामनवमीला मोठा भंडारा होतो. मंदिराचे पुजारी मंगलदास त्यागी सांगतात या देवीचे अनेक चमत्कार सांगितले जातात. ज्या महिलांना अपत्य नाही त्या येथे येऊन मंदिराच्या भिंतीवर पालथ्या हाताच्या निशाण्या उठवितात. त्यांना अपत्य प्राप्ती होते असा विश्वास आहे. हेतू साध्य झाला की नवस फेडण्यासाठी येथे पुन्हा सरळ हाताचे छाप उठविले जातात. असे हजारो छाप येथे आजही पाहायला मिळतात.

Leave a Comment