कंगनाने ट्विटरवर सुरु केला #IndiaRejectsBollywood हा हॅशटॅग


बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगणा राणावत जेव्हापासून सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे, तेव्हापासून ती विविध कारणांमुळे कायम चर्चेत आहे. कंगणाने नुकतेच तिच्या आगामी थलाइवी चित्रपटाचे काम संपवून तिने पुन्हा एकदा बॉलीवूडवर हल्ला आहे. आपल्या कामाने फिल्म इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाला सिनेसृष्टीला बॉलिवूड म्हणणे पसंत नाही. कंगनाने ट्विटरवर नुकताच India Reject Bollywood हा एक नवा हॅशटॅग सुरू केला आहे.


बॉलिवूड या नावावरच टार्गेट करून कंगनाने एक ट्विट केले आहे. कंगनाच्या मते बॉलिवूड हा शब्द अपमानजनक असल्यामुळे लोकांनी हा शब्दच वगळला पाहिजे. विशेष म्हणजे कंगनाने सुरू केलेल्या या मोहिमेला ट्विटरवरून अनेक लोकांचा पाठिंबा देखील मिळत आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणते, येथे कलाकारही आहेत आणि भांड लोके देखी आहेत. ही भारतीय सिनेसृष्टीही आहे आणि येथे बॉलिवूडही आहे. #IndiaRejectsBollywood सर्वात हास्यास्पद शब्द बॉलिवूड हा हॉलिवूडमधून कॉपी करून चोरी केलेला आहे.