कोविड १९ संसर्ग झाल्याने रोनाल्डो विशेष विमानाने इटलीला परतला

फोटो साभार पत्रिका

ज्युवेंटस चा स्टार फुटबॉलर आणि पोर्तुगाल संघाचा कप्तान क्रिस्तियानो रोनाल्डो याला कोविड १९ ची बाधा झाल्याने विशेष मेडिकल फ्लाईटने इटलीला परत आणले गेले आहे. नॅशनल लीग मध्ये मायदेश पोर्तुगाल कडून खेळण्यासाठी रोनाल्डो पोर्तुगालला गेला होता. सोमवारी त्याची कोविड चाचणी केली गेली ती पोझिटिव्ह आली होती. पण त्याला याची कल्पना दिली गेली नव्हती. मंगळवारी त्यांची दुसऱ्यांना चाचणी केली गेली तीही पोझिटिव्ह आल्यावर मात्र त्याला कोविड झाल्याचे सांगितले गेले.

त्यानंतर बुधवारी त्याला विशेष विमानाने त्याचा क्लब ज्युवेंटसने डॉक्टरच्या उपस्थितीत इटलीला आणले असून त्याला क्वारंटाइन केले गेले आहे. रोनाल्डो मध्ये कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत आणि त्याची तब्येत चांगली असल्याचे सांगितले गेले आहे.

इटलीमधील मिडिया नुसार बहुदा पोर्तुगाल टीम मधील दोन खेळाडूंना करोना संसर्ग झाला असावा. पोर्तुगालने बुधवारी रात्री लिस्बन मध्ये स्वीडनचा ३-० असा पराभव केला होता. टीमचा आणखी एक सदस्य वेस्टन मॅक्केनी याचीही करोना टेस्ट पोझिटिव्ह आली असून त्यालाही रोनाल्डो सोबतच विशेष विमानाने इटलीला आणले गेले आहे. या दोघांवर आता तेथील डॉक्टर लक्ष ठेवणार आहेत.