एनर्जी बार खाताय – मग समजून उमजून खा.

आजकाल एनर्जी बार ला प्रचंड लोकप्रियता मिळत असून सर्व थरांतील नागरिक याचे सेवन करताना आढळत आहेत. अनेक कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारात आणली आहेत आणि या बारचे फायदे सांगण्यासाठी त्याच्याच भलतीच चुरसही सुरू आहे. आपलाच बार कसा पौष्टिक आणि एनर्जी देणारा आहे हे जनमानसावर ठसविण्यासाठी मोहक जाहिरातींचा वापरही केला जात आहे.

खेळाडू, व्यायामप्रेमी, कॅलरी कॉन्शस, वजन कमी करण्यासाठी, जेवणाऐवजी, तंदुरूस्त राहण्यासाठी, पोषक मूल्ये योग्य प्रमाणात मिळावी म्हणून अशा अनेक कारणांनी हे बार आज खाल्ले जात आहेत. धान्य, सुकामेवा, जादा उर्जा देणारे पदार्थ, सोयाबिन, मध, नटस्, अनेक प्रकारच्या बिया ,फ्रक्टोज वापरून हे बार बनविले जातात आणि अत्यंत आकर्षक स्वरूपात ग्राहकांपुढे आणले जातात हे खरे असले तरी असे बार खाताना कांही काळजी जरूर घ्यायला हवी असे आहारतज्ञ सांगत आहेत.

हे बार अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. कांहीत कर्बोदके जास्त आहेत तर कांहीत प्रोटीन्स जास्त आहेत. कांहीत फायबरचे प्रमाण अधिक आहे तर कांहीत साखरेचे. हाय प्रोटीन, हाय कार्बो, ४०-३०-३०, हाय फायबर अशी त्यांची जाहिरात केली जाते. मात्र आपल्यासाठी नक्की कशाची गरज आहे हे तपासून मगच त्यांचे सेवन करणे सोयीचे आहे असे तज्ञांचे मत आहे.

वजन कमी करण्यासाठी हे बार खाल्ले जातात मात्र तो जेवणाला पर्याय नाही हे ध्यानात हवे. असे बार आठवड्यातून एखाद्या वेळेच खाणेच योग्य आहे. लांब अंतर पळणार्यांेसाठी अथवा जे शाकाहारी आहेत अशा व्यायामपटूंनी प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असलले बार निवडणे श्रेयकर ठरते. एनर्जी बार हे जेवणाच्या ऐवजी खाण्याचे पदार्थ नाहीत हे आवर्जून लक्षात ठेवले गेले पाहिजे. व्यायामानंतर अथवा व्यायामापूर्वी एनर्जी लेव्हल राहावी म्हणून हे बार योग्य असतात पण रोज ते खाणे हितावह नाही असे तज्ञांचे सांगणे आहे.

सतत कामात असल्याने ज्यांना न्यायाहीसाठीही वेळ नसतो त्यांच्यासाठी हाय फायबर बार अधिक योग्य असतात. व्यायामानंतर व व्यायामापूर्वीही अशा प्रकारचे बार योग्य ठरतात. कुठेही नेणे व कुठेही खाता येणे ही त्यांची वैशिष्ठ्ये असली तरी आपल्या गरजा लक्षात घेऊन आणि नेहमीसाठी नाही तर आणीबाणीसाठीच त्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याचेही तज्ञांचे मत आहे. बार उत्पादक कंपन्यांनी कितीही आश्वासने दिली असली तरी ते मॅजिक फूड नाही याचा विसर आपणच पडू देता कामा नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment