सेलफोन वापराना काळजी घ्या- अन्यथा कर्करोगाला सामोरे जा

रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला छोटासा सेलफोन हा शालेय विद्यार्थ्यांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांचा जिवलग बनला असला तरी ही मुठीत मावणारी जादुई वस्तू तुमच्या जीवाला धोकाही उत्पन्न करू शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

मोबाईल कंपन्यांनी त्यांची सेलफोन सुरक्षित असल्याचे कितीही दावे केले तरी प्रयोगशाळेत केलेल्या परिक्षणातून मोबाईलमधून रेडिएशन येतात हे सिद्ध झाले आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या स्वरूपात हे रेडिएशन होत असते. मात्र याच वेव्हमुळे आपण फोनवरचे संभाषण ऐकू शकतो किवा दुसर्‍यांना फोन करून संभाषण करू शकतेा. या लहरी शॉर्टवेव्हज असतात आणि त्यातील कांही लहरी शरीराकडून शोषल्या जात असतात. तुम्ही घरात आहात, घराबाहेर आहात, वाहनात आहात जेथे कुठे असता त्यानुसार या लहरी शोषण्याचे तसेच लहरींच्या तीव्रतेचे प्रमाण कमी अधिक असते. त्यातून होणारे उत्सर्जन थर्मल आणि नॉन थर्मल असे दोन प्रकारचे असते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

थर्मल म्हणजे फोन वर बोलत असताना फोन तापतो त्यामुळे फोन जवळ असलेला डोक्याच्या भागाचे तापमान कमी प्रमाणात वाढते. अर्थात सूर्यकिरणांपेक्षा हे तापणे कमी असते त्यामुळे मेंदूवर त्याचा फारसा परिणाम होत नसला तरी डोळ्यांना हे तापमान त्रासदायक ठरू शकते. नॉन थर्मल मुळे शरीरातील अनेक संदेशवाहक यंत्रणा कार्यान्वित केल्या जातात परिणामी रक्तवाहिन्यांचे आजार, कर्करोग, घुसमटल्यासारखे होणे, त्वचेच्या संवेदना कमी होणे, डोकेदुखी, लक्ष केंद्रीत न होणे, झोप न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र मोबाईल वापरताना कांही छोट्या बाबींची काळजी घेतली गेली तर हे उपकरण सुरक्षितपणे वापरणेही शक्य आहे. तेव्हा लक्षात ठेवायचे ते असे की जेव्हा मोबाईलला सिग्नल कमी येत असेल तेव्हा रेडिएशन जास्त असते हे ध्यानात घेऊन त्यावेळी मोबाईल वापरणे टाळावे. हँडसेट शरीरापासून तसेच कानापासून किमान १० मिमी. लांब धरावा. शक्यतो हँड फ्री हँडसेटचा वापर करावा. फोनवरून बोलताना फोन एकाच कानाला तसेच एकाच हातात न धरता आलटून पालटून दोन्ही कानांना लावा तसेच हातही बदला. नंबर डायल करताना स्पिकरचा वापर करा. यामुळे फोन उचलेपर्यंत तो कानाला लावून ठेवण्याची गरज पडणार नाही तर फोन उचलला गेल्यानंतरच आपण तो कानाला लावू शकू.

शक्यतो सेलफोनचा वापर मर्यादित करा. आवश्यकता असेल तरच सेलफोन वापरा. अशी काळजी घेतली तर हा जिवलग मित्र तुम्हाला खराच जिवलग होऊ शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment