लग्न न करता झाला १५ मुलांचा बाप!

trent

न्यूयॉर्क – अमेरिकेतील एक ३६ वर्षीय पुरुष लग्न न करता आणि एखाद्या महिलेसोबत संबंधही न ठेवता चक्क १५ मुलांचा बाप झाला आहे. ही घटना आश्चर्यकारक वाटत असली तरी ती खरी आहे. ट्रेंट अर्सेनौल्ट असे त्याचे नाव आहे. त्याने अद्याप लग्न केले नसून कोणत्याही महिलेसोबत त्याचे संबंधही नाहीत. परंतु, तरीही तो चक्क १५ मुलांचा बाप झाला आहे.

मुले होत नसलेल्या दांपत्यांना ट्रेंट आपले शुक्राणू दान करतो. आतापर्यंत दान केलेल्या शुक्राणूंमुळे १५ मुले जन्माला आल्याचा दावा ट्रेंटने केला आहे. आतापर्यंत अनेक दांपत्यांनी त्याच्याकडून शुक्राणू घेतले आहेत.

शुक्राणू दान करण्याचा व्यवसाय भारतातही जोर पकडत असून यावर नुकताच एक चित्रपटही आला होता.

Leave a Comment