देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार स्मार्ट हेल्थ कार्ड

राष्ट्रीय डिजिटल हेल्थ कार्ड मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड प्रमाणे डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाणार असून त्यात संबंधित नागरिकाच्या आरोग्यासंदर्भातील सर्व माहितीचे रेकॉर्ड साठविले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी या योजनेची घोषणा केली होती आणि प्रायोगिक तत्वावर सहा राज्यात या योजनेची सुरवात केली गेली आहे. सध्या अश्या प्रकारची १ लाख कार्ड दिली गेली आहेत.

प्रत्येक नागरिकाची आरोग्य माहिती गोळा करताना त्याला असलेल्या व्याधीचे पूर्ण रेकॉर्ड ठेवले जाईल. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोणते, कोणती औषधे दिली गेली याचेही रेकॉर्ड असेल. आधार कार्ड प्रमाणे हे पोर्टेबल कार्ड नागरिक स्वतःसोबत बाळगू शकणार आहेत. प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड प्रमाणाचे या कार्ड साठी युनिक कोड नंबर दिला जाईल. त्यात मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर नोंदविलेला असेल.

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेमुळे देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होईल आणि २५० अब्ज डॉलर्स जमतील. या डिजिटल हेल्थ कार्ड मधील सर्व माहिती गोपनीय राखली जाणार आहे. रुग्णांना त्यामुळे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील तसेच यातील माहिती पाहून डॉक्टर योग्य उपचार करू शकतील. यातील सहा मुख्य बाबी हेल्थ आयडी, डिजिटल डॉक्टर, हेल्थ फॅसीलीटी रजिस्ट्रेशन, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड, ई फार्मसी आणि टेली मेडिसिन. या कार्ड मधली रेकॉर्ड संबधित व्यक्तीपुरतीच मर्यादित असतील आणि त्याच्या परवानगीनेच दुसरी व्यक्ती किंवा डॉक्टर ही माहिती पाहू शकतील असे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही