गुगलने शोधला सचिन तेंडुलकरसाठी ‘जावई’


दुबई: मैदानासोबत मैदानाबाहेर देखील आयपीएलचा तेरावा हंगाम गाजत असून यंदाचा आयपीएल कोरोना संकटामुळे दुबईत खेळवण्यात येत असला तरीही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. आयपीएलची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर आयपीएलमधील संघ, खेळाडू, त्यांची कामगिरी, मैदानाबाहेरचे किस्से यांचे मिम्स व्हायरल होत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वीच गुगल फिरकीपटू राशिद खानची बायको सर्च केल्यावर अनुष्का शर्माचे नाव दाखवत असल्याची चर्चा झाली. आता युवा क्रिकेटपटू शुभमन गिल देखील अशाच कारणामुळे चर्चेत आला आहे.

गुगलवर शुभगन गिलची बायको असे सर्च केल्यावर सारा तेंडुलकर असे उत्तर मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सारा ही कन्या आहे. तर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचे शुभमन प्रतिनिधित्व करतो. शुभमन गिल २१ वर्षांचा असून अद्याप तरी तो अविवाहित आहे. पण मग ‘शुभगन गिल वाईफ’ सर्च केल्यानंतर सारा तेंडुलकरचे नाव समोर का येते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात त्याचे उत्तर आहे.

याआधीही अनेकदा साराचा प्रियकर शुभमन असल्याची चर्चा झाली. शुभमनने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. नवी कार खरेदी केल्यानंतरचा फोटो होता. साराने त्यावर अभिनंदनाची कमेंट केली होती. त्या कमेंटपुढे काळ्या रंगाचे हार्ट होते. हार्ट इमोजी वापरून शुभमननेही साराचे आभार मानले. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यांच्या ही बाब लक्षात आली. त्याने शुभमनची थट्टा करण्यासाठी लगेच कमेंट केली. तिच्याकडूनही तुझे खूप खूप आभार, हार्दिकने अशी कमेंट केली. त्यानंतर शुभमन आणि साराचे नाव अनेकदा एकत्र चर्चेत आले.

साराने २९ जुलैला तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तर त्याच दिवशी शुभमन गिलने देखील स्वत:चा एक फोटो ट्विट केला. दोन्ही फोटोचे शिर्षक एकच (आय स्पाय) असल्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली. फोटोखाली कमेंट करून अनेकांनी याकडे लक्ष वेधले होते. १२ ऑक्टोबरला साराचा वाढदिवस होता. केकेआरचा सामना त्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होता. या सामन्यात शुभमनने चांगली सुरुवात केली. पण तो ३४ धावांवर बाद झाला. याचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.