संगोपन नवजात बाळाचे…!

मातृत्व हा कोणत्याही स्त्री करिता दुसरा जन्मच असतो. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याच सोबत आणि अधिक महत्वाचा काळ त्या जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो.

बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणार्याअ मातेची ती जबाबदारी आहे असेच मानले जाते. मातेनच त्या बाळासाठी कष्ट उपसायचे आणि बापाने फक्त शाळेत जाताना मुलाला आपले नाव द्यायचे असा समाज आणि समजही आहे असे म्हणता येईल.

मुलीचे वय १८ वर्षे झाल्याखेरीज विवाह करु नये असा कायदा आहे मात्र त्याचे सर्रास उल्घंन होताना आपणास दिसते. या वयात मुलगी किमान शारिरीक पातळीवर सक्षम होत असली तरी मानसिक स्तरावर तिची भूमिका तितकी तयार असत नाही त्यामुळे नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची याचे ज्ञान तिला असत नाही.

जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे ज्ञान येते तसेच अंधश्रध्दा आणि चुकीच्या पध्दती देखील येत असतात या पध्दती चुकीच्या आहेत याची माहिती नव्या पिढीला असायला हवी. विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशा गैरसमजुती मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे बाळाच्या आणि मातेच्याही जीवाला धोका होवू शकतो याची जाणीव आपणास असली पाहिजे.

लहान बाळाच्या कानात तेल टाकणे व मळ काढणे याची गरज नसते. अशा प्रकारे तेल टाकल्यामुळे बाळाचे नाक गच्च होण्यापासून न्यूमोनिया होण्याचाही धोका असतो बाळाच्या डोळ्यात सतत पाण्याचा पाझर आणू शकतात हे आपण लक्षात ठेवावे. बाळ जन्माला येताच त्याला अंघोळ घालणे धोकादायक ठरु शकते. बाळाचे वजन कमी असल्यास किमान सात दिवस त्याला अंघोळ घालू नये . बाळाची नाळ स्वच्छ आणि कोरडी राहिली पाहीजे याचीही काळजी घ्यावी. बाळाची शी धुतल्यानंतर प्रत्येकवेळी मातेने साबणाने हात धुणे आवश्यक आहे.
जन्म देण्यासोबतच संगोपन देखील अत्यंत जबाबदारीचे काम समजून आपण बाळाला जपले तरच आपण त्याला उत्तम आरोग्याची भेट देऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment