मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वाचन आवश्यक

readingमेलबोर्न: जे पालक त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच वाचनाची सवय लावतात त्या मुलांची शाळेत वाचन, लेखन, भाषा आणि गणिती कौशल्य इतरांपेक्षा चांगली असतात असे नुकत्याच प्रसिद्ध झलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे.अशी मुले नेप्लेन या ऑस्ट्रेलियन बौद्धिक चाचणीतही मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात.

ऑस्ट्रेलिअन इनस्टीटयुट ऑफ फ्यामिली स्टडीज च्यावतीने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की; वयाच्या ४ व ५ व्या वर्षीच वाचनाचा पाया मजबूत असेल तर त्या ठिकाणचा साक्षरता दर ही जास्त असतो. हे सर्वेक्षण ४ वर्षे व त्यावरील वयाच्या मुलांसाठी करण्यात आला. संशोधक डॉ.किलीयान मुलान आणि गलीना दरगनोवा यांनी म्हटले आहे की; पालक त्यांच्या मुलांचा शैक्षणिक विकास चांगला होण्यासाठी त्यांच्या जन्मापासूनच प्रयत्नरत असतात. या अभ्यासाठी ५००० मुलांच्या ४-५ वर्ष आणि नंतर १०-११ वर्षे या वयातील त्यांच्या डायरीचा आधार घेण्यात आला.

या अभ्यासात त्यांना आढळले की ५० % लहान मुले रोज वाचतात. ३० % मुले आठवड्यातून ३ ते ५ दिवस वाचतात,तर ५ पैकी १ जण आठवड्यातून १ किंवा २ दिवस वाचतो. डॉ मुलान यांनी,’ मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कुटुंबातच पोषक वातावरण हवे व लहान वयातच त्यांच्यावर वाचनाचे संस्कार केले तर साक्षरता दर वाढेल ‘असे ठळक पणे म्हटले आहे.

Leave a Comment