भारतीय मुलीचा बुद्ध्यांक आइनस्टाइनपेक्षा अधिक

einstneलंडन: भारतीय बुद्धिमत्तेचा सध्या माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रासह जगभरात बोलबाला आहे. ब्रिटनमधील एका १२ वर्षीय मुलीचा बुद्ध्यांक प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्यापेक्षाही अधिक असल्याचे एका चाचणीतून उघड झाल्याने यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे.

नेहा रामू असे या अतिबुद्धिमान मुलीचे नाव आहे. डॉक्टर दाम्पत्याची मुलगी असलेल्या नेहाने मेनसा आयक्यू टेस्टमध्ये सुमारे 1१६२ गुण मिळविले. मेनसा हे उच्च बुद्ध्यांक असलेल्यांची चाचणी करण्याचे केंद्र आहे. तिच्या वयोगटासाठीचे हे सर्वाधिक गुण आहेत. या गुणांमुळे तिने ब्रिटनमधील बुद्धिमान व्यक्तींना मागे तर टाकलेच, त्याचप्रमाणे १६० बुद्ध्यांक असणार्‍या नामवंत भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यावरही मात केली.

नेहा सात वर्षांची होईपर्यंत तिचे पालक ब्रिटनमध्येच राहात होते, असे वृत्त द टेलिग्राफने दिले आहे. २८० पैकी २८० गुण मिळवत शाळेतही तिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखविली आहे. हॅरी पॉटरच्या चित्रपटाची चाहती तसेच पट्टीची जलतरणपटू असलेल्या नेहाला आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत डॉक्टर व्हायचे आहे.

Leave a Comment