बॅरन ट्रम्पला सुद्धा झाला करोना- फर्स्ट लेडीचा खुलासा

फोटो साभार, एक्सप्रेस डॉट को

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी त्यांचा मुलगा बॅरन यालाही करोनाचा संसर्ग झाला होता अशी कबुली बुधवारी सोशल मीडियावर दिली आहे. मेलेनिया आणि अध्यक्ष ट्रम्प यांची करोना चाचणी पोझिटिव्ह आल्यावर बॅरन याचीची चाचणी केली गेली होती मात्र तेव्हा त्याला करोना संसर्ग झालेला नव्हता असे मेलेनिया म्हणतात. बॅरन मध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती मात्र त्याची दुसऱ्यावेळी जेव्हा टेस्ट केली गेली तेव्हा त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला होता असे मेलेनिया यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, जेव्हा बॅरन चा चाचणी अहवाल नकारात्मक आला तेव्हा मी सुस्कारा सोडला. पण आम्ही दोघे करोना संक्रमित होतो त्यामुळे पुढचे दिवस कसे असतील याची काळजी वाटत होती. बॅरनची दुसरी चाचणी झाली तेव्हा त्याचा अहवाल पोझिटिव्ह आला. त्यामुळे त्यालाही करोना संसर्ग होईल अशी जी भीती मला वाटत होती ती खरी ठरली. अर्थात बॅरन अतिशय हिमतीचा आहे. त्याच्यात तेव्हाही करोनाची लक्षणे दिसत नव्हती.

मेलेनिया त्यांच्या पत्रात लिहितात आम्ही तिघेही उत्तम आहोत. या परिस्थितीत आम्ही एकमेकांची काळजी घेऊ शकलो. एकत्र वेळ घालवू शकलो. आता बॅरनचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. व्हाईट हाउस कडून या संदर्भात कोणताही खुलासा केला गेलेला नाही. त्यामुळे अमेरिकन नागरिक बॅरनच्या करोना अहवालाची माहिती का दिली गेली नाही असा प्रश्न करत आहेत असे समजते.