फेस्टीव्ह सेल मध्ये प्रथमच विक्रीला येणार हे स्मार्टफोन

दसरा दिवाळी निमित्त सुरु होणाऱ्या सेलच्या प्रतीक्षेत ग्राहक आहेत. त्यातही ग्राहकांची नजर १६ व १७ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या ई कॉमर्स कंपन्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ग्रेट इंडिअन फेस्टिव्हल आणि बिग बिलियन डेज या सेलवर लागली आहे. या सेल मध्ये स्मार्टफोन वर डिस्काऊंट दिले जात आहेतच पण अनेक ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत.

या दोन्ही फेस्टिव्हल सेल मध्ये नामांकित कंपन्याचे स्मार्टफोन प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी साठी चांगला चॉइस मिळू शकणार आहे. या दोन्ही सेल मध्ये प्रथमच विक्रीसाठी येणारे फोन खालीलप्रमाणे आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम ३१ प्राइम हा फोन आजच भारतीय बाजारात दाखल झाला असून १७ ऑक्टोबर पासून अमेझॉनवर विक्रीसाठी येत आहे. त्याची किंमत १६४९८ रुपये आहे. या फोनला ६ हजार एमएएच बॅटरी आणि क्वाड कॅमेरा सेट दिला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ हा फोन प्रथमच विक्रीसाठी फ्लिपकार्टवर १६ ऑक्टोबर पासून उपलब्ध होत आहे. त्याच्या खरेदीवर १ हजार रुपये डिस्काऊंट दिला जात आहे. ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजचे व्हेरीयंट डिस्काऊंट सह १५९९९ रुपयात तर १२८ जीही स्टोरेज व्हेरीयंट १६९९९ रुपयात मिळणार आहे.

इन्फिनिक्स हॉट १० फ्लिपकार्टवर प्रथमच विक्रीसाठी आला असून तो ९९९९ रुपयात मिळणार आहे. त्याला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. टेक्नो कॅमन १६ फ्लिपकार्टवर १०९९९ रुपयात मिळणार आहे. त्याला ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि ६४ एमपी क्वाड कॅमेरा सेट आहे.

गुगल पिक्सल ४ ए फ्लिपकार्टवर विक्रीसाठी १६ ऑक्टोबर पासून येत आहे. त्याचे सिंगल व्हेरीयंट येथे मिळू शकेल. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा हा फोन मुळचा ३१९९९ रुपये किमतीचा असून तो सेल मध्ये २९९९९ रुपयात मिळू शकणार आहे.