भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी


मुंबई – भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांना धमकीचे दहा फोन आले. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दोन जणांना मुंब्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

दहा वेगवेगळ्या क्रमांकाच्या फोनवरून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शेलार यांना धमकीचे फोन आले. मोठे नेते बनू नका, नाही तर ठार मारू अशा शब्दांत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा मुंब्रा येथून धमकीचे फोन आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.