अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांकडून समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


मुंबई – रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णब गोस्वामीला सीआरपीसीच्या कलम 108 ((1) (अ) अंतर्गत मुंबईतील वरळी विभागातील एसीपीने नोटीस पाठवून 16 ऑक्टोबरला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. वांद्रे स्थानकाबाहेर लॉकडाऊन दरम्यान जमलेली गर्दी आणि पालघर लिंचिंग प्रकरणी केलेल्या रिपोर्टिंगविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात अर्णब यांनी भावना भडकावणाऱ्या गोष्टी बोलतात. यामुळे जातीय तणाव पसरतो. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये का? असा आरोप मुंबई पोलिसांचा आहे.

108 (1) (अ) हे सेक्शन चॅप्टर प्रोसिडिंगशी संबंधीत आहे. एसीपी रँकच्या अधिकाऱ्याला चॅप्टर प्रोसिडिंगमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेटचे अधिकार मिळालेले असतात. अर्णब पालघरमधील संतांची हत्या आणि वांद्रेमध्ये जमा झालेल्या गर्दीविषयी आपल्या शोमध्ये धार्मिक भावना भडकवणारे भाष्य केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दोन्ही कार्यक्रमांदरम्यान लॉकडाउन असल्याने दंगल झाली नाही. काही दिवसांपूर्वी खारच्या एका केसमध्ये मुंबई पोलिसांनी अर्णब व्यतिरिक्त रिपब्लिक टीव्ही चॅनलचे अजून एक पत्रकार प्रदीप भंडारी यांनाही समन्स बजावला होता. या नोटीसचा बनावट टीआरपीशी काहीही संबंध नाही.

अर्णब यापुढे कोणतेही धार्मिक भावना भडकावण्याचे काम करणार नसल्यामुळे त्यांनी 16 ऑक्टोबरला एसीपींसमोर हजर होऊन 10 लाखांचा हा बाँड भरावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. रिपब्लिक टीव्हीचे नाव बनावट टीआरपी प्रकरणी पुढे आले आहे. या प्रकरणी क्राइम इंटेलिजेंस युनिट तपास करत आहे. आज चॅनलसंबंधित अजून दोन लोक निरंजन नारायण स्वामी आणि अभिषेक कपूर यांना समन्स बजावण्यात आला आहे. दोघांना दुपारी 12 वाजता मुंबई पोलिस मुख्यालयात तपास टीमसमोर हजर व्हायचे आहे. यापूर्वी मुंबई क्राइम ब्रांच टीम मंगळवारी BARC च्या परेल येथील ऑफिसमध्ये पोहोचली आणि टीआरपी कशी मॉनिटर केली जाते याची पडताळणी केली.

काही दिवसांपूर्वी रिपब्लिक चॅनलवर हंसा कंपनीचा एक रिपोर्ट दाखवण्यात आला होता. मुंबई क्राइम ब्रांचने त्या रिपोर्टच्या क्रेडिबिलिटीच्या तपासासाठीही आपला तपास सुरू केला आहे. समन्समध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपब्लिक टीव्हीवर हंसा कंपनीचा 10 ऑक्टोबरला रिपोर्ट दाखवण्याचा उल्लेख आहे.