काय सांगते  लीचमन  यांची अध्यक्षीय निवडणुकीची भविष्यवाणी?

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होईल याचा गेली ३५ वर्षे अचूक अंदाज देणाऱ्या एका व्यक्तीकडे अमेरिकन नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. १९८४ पासून आजपर्यंत या व्यक्तीने या संबंधात वर्तविलेले सर्व अंदाज बरोबर आले आहेत. एलन लिचमन असे या व्यक्तीचे नाव असून ते इतिहासाचे प्रोफेसर आहेत. निवडक तज्ञ व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते.

यंदा अमेरिकन निवडणुकीत रिपब्लिकनचे डोनल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे जो बायडेन यांच्यात लढत आहे. एलन यांनी ‘ द कीज टू द व्हाईट हाउस’ या नावाने एक सिस्टीम विकसित केली आहे. त्याला ’१३ कि मॉडेल’ असेही म्हटले जाते. यामध्ये १३ प्रश्न किंवा मुद्दे आहेत. त्याची उत्तरे हो किंवा नाही अश्या पद्धतीने द्यायची असतात. त्यातून पुढचा राष्ट्रपती कोण असेल याचा अंदाज एलन बांधतात.

या प्रश्नावलित अधिक उत्तरे होकरार्थी असतील तर दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरलेला उमेदवार पुन्हा राष्ट्रपती बनण्याची शक्यता नाही असे मानले जाते. या उलट या प्रश्नावलीत अधिक उत्तरे नकारार्थी असतील तर अमेरिकेला नवा अध्यक्ष मिळणार असे मानले जाते. विशेष म्हणजे यंदा या १३ प्रश्नात ७ उत्तरे नकारात्मक आणि ६ उत्तरे होकारात्मक आहेत.

एलन यांच्या मते १९९२ नंतर डोनल्ड ट्रम्प दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा संधी न मिळणारे पहिलेच अध्यक्ष असतील. यापूर्वी १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी जॉर्ज एच बुश याना हरवून अध्यक्षपद मिळविले होते. त्यानंतर आत्तापर्यंत सर्व अध्यक्षांना दोन टर्म मिळाल्या आहेत.

यंदा ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत १ कोटी हून अधिक मतदारांनी अगोदरच मतदान केले आहे. ठरलेल्या तारखेच्या आधी इतक्या प्रमाणावर मतदान होण्यामागे करोनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळून मतदान करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.