सुंदर त्वचेसाठी मुलतानी माती

मुलतानी मिट्टी किवा मुलतानी माती भारतात शेकडो वर्षांपासून त्वचेच्या सौदर्यासाठी आणि निरोगीपणासाठी वापरली जात आहे. जेव्हा कॉस्मेटिक्स बाजारात नव्हतीच तेव्हापासून भारतीय महिला आपल्या त्वचेसाठी ही माती वापरत आल्या आहेत. बाजारातील महागडी आणि कांहीवेळी त्वचेला अपाय होऊ शकणारी क्रीम्स किवा पॅक वापरण्यापेक्षा ही माती निर्धकपणे त्वचेसाठी वापरता येते आणि महागड्या कॉस्मेटिक्सच्या तुलनेत ती स्वस्त असतेच पण त्यापासून कोणताही अपाय होण्याचा धोका नसतो. चेहर्या्वरील सुरकुत्या, पुरळ, मुरमे, काळे डाग, ब्लॅक हेड, व्हाईट हेड, व्रण यासारख्या अनेक कारणांसाठी ही माती अत्यंत सुरक्षित आणि उपयुक्त आहे. त्यामुळे ती वापरून त्वचेवर काय चमत्कार घडतो हे अनुभवण्यास कांहीच हरकत नाही.

या मातीचे काही फायदे प्रथम समजून घेऊ. या मातीत मॅग्नेशियम क्लोराईड असते ज्यामुळे पुटकुळ्या आणि त्वचेवरील डाग कमी होतात. त्वचा तेलकट असेल तर ही माती त्वचेतील अनावश्यक जादा तेल शोषून घेते आणि नवीन पिपल्स येण्यास अटकाव करते. या मातीपासून बनविलेले फेसपॅक त्वचा स्वच्छ बनवितात पण धूळ. तेल व त्वचेवरील मृत पेशी हटवितात. त्वचेला लाली येत असेल तर ती कमी करण्यासाठी आणि व्रण कमी करण्यासाठी तसेच त्वचेला शांत आणि सूदिंग इफेक्ट देण्यासाठीही ही माती अतिशय उपयुक्त ठरते. तसेच त्वेचवर पिगमेंटेशन हेात नाही आणि त्वचा टॅन होण्यापासूनही सुटका होते.

या मातीपासून घरच्याघरीच फेसपॅक बनवून ते वापरता येतात.

त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद घालून त्याची पातळ पेस्ट करावी आणि चेहरा व मानेवर लावावी. डोळ्याभोवती लावू नये. हा पॅक वाळू द्यावा व नंतर पाण्याचे तोंड स्वच्छ धुवावे. पॅक लावल्यानंतर जास्त बोलू नये अथवा चेहर्यावची जास्त हालचालही करू नये.

नॉर्मल त्वचा असेल तर मातीत दूध आणि बदामाची थोडी पूड घालून पॅक करावा आणि चेहर्यातवर लावावा. पुटकुळ्या येत असतील तर त्या जाण्यासाठी या मातीत कडूनिंब आणि कापूर घालून गुलाबपाणी घालावे व ते मिश्रण त्वचेवर लावावे. हे मिश्रण आठवड्यातून एकदाच लावावे.

पिंपलचे डाग त्वचेवर असतील तर मातीत ताज्या टोमॅटोचा रस, चिमूटभर चंदन पावडर आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवावी आणि ती चेहर्यामवर लावावी. डोळ्याखालची काळी वर्तुळे जाण्यासाठी माती दही आणि पुदीन्याच्या पानाच्या पेस्टसह कालवावी आणि लावावी. हा पॅक अर्धा तास चेहर्याआवर ठेवून नंतर कोमट पाण्याने तोंड धुवावे.

विशेष म्हणचे त्वचेला कोणताही विकार नसेल आणि त्वचा चांगलीच असेल तरी ती अधिक चांगली, मऊ तसेच चमकदार होण्यासाठी या मातीचा लेप थेाड्याश्या तेलासह चेहर्यांवर लावावा.
 
ही माती ओळखायची कशी असा एक प्रश्न येतो. मात्र ती वास आणि रंगावरून सहज ओळखता येते. मातीचा रंग फिकट पिवळसर असतो तर वास ताज्या चिखलासारखा असतो. या मातीपासून बनविलेले पॅक बाजारात मिळतात मात्र शक्यतो मातीच विकत आणून वरीलप्रमाणे आवश्यकतेनुसार मिश्रण करून केलेले पॅक स्वस्त पडतात तसेच त्यापासून अपाय होण्याची भीतीही राहात नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment