मोहविणारी परफ्युम्सची दुनिया

आज तरूणाई असो, महिला वर्ग असो नाहीतर आपला पारंपारिक पुरूष वर्ग असो. परफ्युम हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परफ्युम, डिओडोरंट, अत्तरे कांही ना काही प्रत्येकजण वापरत असतोच. त्यासाठी महिन्याकाठी चांगला खासा पैसाही खर्च करतो. रसिक आणि छानछोकीने राहणार्याा व्यक्तींसाठी महागडे परफ्युम्स ही वेगळी शान असते.

रोजच्या वापरातल्या परफ्युमसाठीही आपण चांगला खर्च करत असतोच. पण जगातील सर्वाधिक महागडे परफ्युम्स काय किमतींना मिळत असतील याची कल्पनाही आपण करू शकणार नाही हे सत्य आहे. अशाच कांही परफ्युमविषयी. हे परफ्युम्स इतके कॉस्टली आहेत की ते नुसते पाहण्यासाठी पैसे आकारले गेले तर ते तरी आपल्याला परवडेल का अशी शंका यावी.

क्लाईव्ह ख्रिस्टीयन नं १ हा इंपेरियल मॅजेस्टी परफ्युम जगातला सर्वात महागडा परफ्युम असून त्याची किंमत आहे औसाच्या बाटलीला तब्बल १२७२१ डॉलर्स. त्यापाठोपाठ नंबर येतो तो बॅकार्ट लास  लार्सस सेक्रीस डी थेब्ज या परफ्युमचा. त्याची किंमत आहे औंसाला ६८०० डॉलर्स. क्लाईव्ह ख्रिस्टीनचाच आणखी एक परफ्युम २१५० डॉलर्सला उपलब्ध आहे तर हर्मेस २४ फाऊबर्ग परफ्युमसाठी १५०० डॉलर्स मोजावे लागतात. कॅरन प्रोव्ह १००० डॉलर्सला मिळतो तर जीन पॅटो जॉय हा परफ्युम ८०० डॉलर्सला आहे.

जारबोल्ट ऑफ लायटनिंगसाठी मोजावे लागतील ७६५ डॉलर्स तर अॅनिक गौर यू डी डृड्राईन साठी ४४१ डॉलर्स. शालिनी या नावाच्या परफ्युमची किंमत आहे ४०९ डॉलर्स तर चॅनल नंबर पाच मिळतो १२१ डॉलर्सला. जगातले हे सर्वाधिक दहा महागडे परफ्यूम्स आहेत. हे कोण खरेदी करतो याची माहिती मात्र मिळालेली नाही.

Leave a Comment