मानवच सर्वाधिक बुद्धिमान का?

शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचे कारण आता लक्षात आले आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ १२२० या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.

विश्वभरातील प्राणीमात्रांमध्ये माणूस हाच सगळ्यांत बुद्धिमान प्राणी मानला जातो. इतर प्राणी मानवापेक्षा शत्ति*मान असूनही पृथ्वीवर माणसाचीच सत्ता राहाण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी. या बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने आपली प्रगती केली आणि तो इतर प्राण्यापेक्षा वेगळा ठरला.

डीयूएफ १२२० प्रोटिन्समधील एक डोमेन आहे. या कणांची संख्या मानवी शरीरात इतर जनावरांपेक्षा अधिक आहे. प्रोफेसर जेम्स सिकेला यांनी यासंदर्भात सांगितले, की या संशोधनामुळे मानवी मेंदूच्या व्यापक विस्तारावर अधिक प्रकाश पडला आहे. यावर अधिक संशोधन केल्यास मानवाचा बुद्ध्यांक वाढवण्याचे तंत्रही विकसित होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment