चमत्कार खरच घडतात बरं का!

जगात चमत्कार घडतात याचा अनुभव देणारी एक घटना नुकतीच ब्रिटनमध्ये घडली. त्याचे झाले असे की रिचर्ड लेन या इसमाचे वॉलेट चोरीला गेले. अर्थात वॉलेट चोरीला जाणे हा चमत्कार नाही. पण ही चोरी झाली होती तब्बल ३५ वर्षांपूर्वी. म्हणजे रिचर्डने पाकिट परत मिळेल याची आशा केव्हाच सोडली असणार. त्यानंतर त्याने अनेक पाकिटेही विकत घेतली असतील. पण नुकतेच त्याला त्याचे हे ३५ वर्षांचे जुने  पाकिट आतील कागदपत्रांसह परत मिळाले. त्यातील पैसे मात्र गायब झाले होते.

रिचर्डचे पाकिट हरविले तेव्हाच त्याला चोराने ते त्यात असलेली १५ पौंडाची रक्कम काढून घेऊन फेकून दिले असणार याची खात्री पटली होती. या पाकिटात त्याचा वाहनचालक परवाना, जिम व युनियन मेंबरची कार्डे अशी कागदपत्रेही होती. सेंट आवव्हीक्स येथे एका बिल्डरचे मजूर लिफ्ट शाफ्टचे काम करत असताना त्यांना हे पाकिट दिसले. येथून १०० मैलांवर रिचर्ड राहतो. पाकिट सापडताच ते ओळख पटवून नेण्याचे आवाहन टिव्हीवरून केले गेले ते नेमके रिचर्डच्या मातोश्रींनी पाहिले आणि त्यांनी रिचर्डला त्याची माहिती दिली.

रिचर्ड पाकिटाची ओळख पटविण्यासाठी गेला आणि खरोखरच त्याला त्याचे पाकिट परत मिळाले तेही तब्बल ३५ वर्षे लेाटल्यावर. फक्त त्यातील पैसे गायब झाले होते.

Leave a Comment