एकच चेंडूवर दोन वेळा आउट झाला रशीद

आयपीएल २०२० स्पर्धेत दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सनरायझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपरकिंग यांच्यामध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात हैद्राबादचा फलंदाज रशीदखान अजब प्रकारे आउट झाला. एकच चेंडूवर काही सेकंदाच्या अंतराने दोन वेळा आउट होण्याचा विक्रम रशीदने केला.

क्रिकेट मध्ये फलंदाज आउट होण्याचे अनेक प्रकार आहेत. बोल्ड, एलबीडब्ल्यू, कॅच, रनआउट, हिट विकेट असे  हे अनेक प्रकार आहेत. पण एकच चेंडूवर दोन वेळा आउट होण्याचा प्रकार दुर्मिळ म्हणावा लागेल. मंगळवारच्या सामन्यात हैद्राबाद टीमला चेन्नई सुपरकिंग्सच्या १६७ रन्सचा पाठलाग करताना अखेरी सात चेंडू मध्ये २२ धावा हव्या होत्या. रशीद जोरदार फलंदाजी करत होता. त्यावेळी शार्दुल ठाकूरचा चेंडू लॉंग ऑनच्या वरून फटकावण्याच्या नादात तो क्रीझ मध्ये बराच मागे गेला आणि त्याचा पाय विकेटला लागला.

त्याचवेळी त्याच्या बॅटवर चेंडू व्यवस्थित न आल्याने त्याचा कॅच लॉंग लेगला फिल्डिंग करत असलेल्या दीपक चाहर याने पकडला. पण चाहर ला कॅच पकडण्यापूर्वीच रशीद हिट विकेट आउट झाला असल्याचे समजले. रशीदला अंपायरनी हिट विकेट आउट घोषित केले.