अॅपल आयफोन १२ आला

फोटो साभार जीएसएम अरेना

दीर्घ काळ प्रतीक्षा असलेले, स्वस्त आयफोन १२ प्रो, १२ प्रो मॅक्स आणि आयफोन १२ मिनी अखेर १३ ऑक्टोबररोजी झालेल्या अॅपल इव्हेंट मध्ये लाँच झाले. हे सर्व फोन भारतात ३० ऑक्टोबर पासून उपलब्ध होणार आहेत. नव्या ए १४ बायोनिक प्रोसेसरसह, जगातील सर्वात अॅडव्हान्स टेक्नोलॉजी असलेले हे फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे सर्व फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करतात.

आयफोन १२ प्रोची किंमत ९९९ डॉलर्स, प्रो मॅक्सची किंमत १०९९ डॉलर्स आहे. आयफोन १२ मिनी दोन व्हेरीयंट मध्ये सादर झाला असून ५.४ इंच स्क्रीनसाठी ६९९ डॉलर्स तर ६.१ इंची स्क्रीनसाठी ७९९ डॉलर्स अश्या त्याच्या किमती आहेत. जगातील हे सर्वाधिक स्लीम, स्मॉल आणि फास्ट ५ जी फोन असल्याचे सांगितले जात आहे.

आयफोन १२ व मिनी ६४, १२८ व २५६ जीबी स्टोरेज व्हेरीयंट मध्ये चार कलर ऑप्शन सह आहेत तर आयफोन १२ प्रो व प्रो मॅक्स १२८, २५६, ५१२ जीबी स्टोरेज व्हेरीयंट मध्ये आहेत. ग्रॅफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पॅसिफिक ब्ल्यु कलर ऑप्शन मध्ये हे फोन मिळतील. या फोन साठी ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला आहे तर बाकी फोनसाठी ड्युअल कॅमेरा सेट दिला गेला आहे