संजय राऊतांनंतर ‘शट अप कुणाल’मध्ये हजेरी लावणार सुप्रिया सुळे?


मुंबई – कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता कुणाल कामराची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतली असून ट्विट करत त्यांनी With Kunal Kamara असे लिहिल्यामुळे संजय राऊत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही ‘शट अप कुणाल’मध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता लागली आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरासोबतच्या भेटीचा फोटो सुप्रिया सुळेंनी ट्विट केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.


आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती कुणाल कामराने घेतल्या आहेत. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंची मुलाखत कशी असणार? ते पाहण्याची उत्सुक्ता सगळ्यांनाच लागली आहे.